औरंगाबाद- एआयएमआयएम चे नेते अकबर उद्दीन ओवेसी यांच्या तेलंगना विधानसभेच्या निवडणुकीतील विजयाचा एमआय़एम कडून जल्लोष करण्यात आला. बुढी लाईन येथे गुलाल उधळून एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला. एमआयएम पक्षाच्या प्रचारासाठी औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील आणि एमआयएमचे काही नगरसेवक देखील रवाना झाले होते.
अकबर उद्दीन ओवेसी यांनी हेदराबादमधील चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून ५९ हजार २७४ मतांची आघाडी
घेऊन विजय मिळवला आहे. ओवेसी १९९९ पासून या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत
आहेत.










